सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यां साठी कला उत्सव स्पर्धा

0
79

सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन 2015-16 पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. सन 2021-2022 मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत वादन, पारंपारिक लोकसंगीत वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, द्विमितीय चित्र, त्रिमितीय चित्र / शिल्प व स्थानिक खेळणी तयार करणे या 9 संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ऑनलाईन कला उत्सवासाठी दिनांक 10 डिसेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशित करावयाचे आहे.

कला उत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक (Solo) सहभाग असणार आहे. विद्यार्थी केवळ एका कलाप्रकारात सहभाग घेऊ शकतो. इतर व्यावसायिक कलाकारांचा सहभाग किंवा मदत घेता येणार नाही. 4 ते 6 मिनिटांचा व्हीडिओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा. व्हीडिओतील चित्र व आवाज स्पष्ट असावे. तयार केलेला व्हीडिओ व सोबत कला सादर करतानाचे पाच फोटो विद्यार्थ्यांने स्वत:च्या /पालक/शिक्षकांच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर किंवा युट्युब अंकाऊट वरु #kalautsavmah2020 या हॅशटॅगचा वापर करुन दिनांक 13 नोव्हेंबर 2021 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोस्ट करावा. व्हीडिओ पोस्ट करताना विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, शाळेचा पत्ता, शाळेचा यु-डायस क्रमांक, तालुका, जिल्हा, ई-मेल आयडी, संपर्क क्रमांक व भाग घेत असलेला कला प्रकार इत्यादी उल्लेख करावा.

विद्यार्थ्यांने आपली नोंदणी https://scertmaha.ac.in/kalautsav या पोर्टल वर जाऊन करावी. अधिक माहितीसाठी रुपाली देसाई मो. न. 9422146184 व वर्षा कांबळ, अधिव्याख्याता मो. नं. 9625460992 समता विभाग प्रमुख, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी कला उत्सवामध्ये सहभाग घेण्यात यावा. असे आवाहन अनुपमा तावशीकर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here