सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 90 महसुली गाव कोरोनामुक्त!

0
143

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 90 महसुली गावांमध्ये कोरोना बाधीत रुग्ण आढळून आलेला नाही. या गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. तसेच येत्या 10 दिवसांमध्ये ज्या गावांमध्ये सक्रीय कोरोना बाधीत रुग्ण संख्या नसेल अशा गावांमध्ये देखील लसीकरण सत्रे प्राधान्याने आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत आणि मुख्य कार्याकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

जिल्हामध्ये कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असताना या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यातील 90 महसुली गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळलेले नाहीत. या गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना चांगल्या तऱ्हेने राबविण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राकडील कोविड लसीकरणाची नियमित सत्रे नेहमीप्रमाणे सुरु राहतील. तसेच हात धुणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे या त्रिसुत्रीचा वापर करुन कोरोना पासून बचाव करावयाचा आहे. 90 महसुली कोरोनामुक्त गावांमध्ये तसेच सक्रीय रुग्णसंख्या नसलेल्या गावांमध्ये कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींचे सत्र लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. 45 वर्षावरील ग्रामस्थांनी या सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 90 महसुली गावे कोरोनामुक्त
तालुका निहाय कोरोना मुक्त गावे – तालुका कणकवली – बंदरगाव, शेर्पे, बेर्ले, मठ खुर्द, कळसुली, सावडाव, ब्रह्मनगरी, कासरल, सांगवे – नवनगर, भिरवंडे – नेहरुनगर, भिरवंडे – सुभाषनगर, सांगवे – संभाजीनगर, नरडवे – भैरवगाव, जांभुळगाव, येवतेश्वर. दोडामार्ग तालुका – तेरवण, फुकेरी, खडपडे, देवगड तालुका – फणसे, मोहुल, जुवेश्वर, चिंचवाड, पालेकरवाडी, उंडील, बुरांबावडे, मालपे, वेळगीवे, शिरवली, शेराघेरा कामते, निमतवाडी, बगताळेवाडी. वेंगुर्ला तालुका – खालची केरवाडी, पलताड, सात वायंगणी. कुडाळ तालुका – घाडीगाव, सोनवडे – दुर्गानगर, पणदूर – नेहरूनगर, मिटक्याचीवाडी, बेलनडी, कुसगाव, भडगाव, वासोली, साकीर्डे, कंडुली, कवठी, चेंदवण – गांधीग्राम, चेंदवण – नाईकनगर, गावधाड, मुनगी. मालवण तालुका – घाडीवाडी, मालडी, अडवली, मठ बु., कुडोपी, बुधवळे, बांदिवडे बु., कोईल, बांदिवडे खु., सय्यद जुवा, माळवाडी, जामडुळ, हिर्लेवाडी, तेरी, पालकरवाडी, अपराजवाडी, चंदेर, खाजणवाडी, मागवणे, देऊळवाडा, आंगणेवाडी, वाडी डांगमोडे, बिळवस, डांगमोडे, तिरवडे, पराड, सोनारवाडी, मोगरने, वायंगडे, खालची देवली, माळकेवाडी, परबवाडा, बागवाडी, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, टेंबवडे, नागझर, मळा, वाक, वाघवणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here