सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी – निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

0
111

सिंधुदुर्ग – बंगालच्या उपसागरात 11 जून रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे जिल्ह्यात दि. 10 व 11 जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागांना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सर्व विभागांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेला अतिवृत्षीची पूर्वसूचना द्यावी व त्याप्रमाणे आवश्यक ते नियोजन करावे. शोध व बचावाची सामग्री सुस्थितीत असल्याची खात्री करावी. आपत्कालीन संपर्क क्रमांक सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. दि. 10 जून ते 11 जून या कालावधीत कोणीही मुख्यालय सोडू नये.

बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेली झाडे त्वरित बाजुला करुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. ऑक्सिजनची वाहतूक करणारे मार्ग अखंडितपणे सुरू राहतील यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे.

बंदर विभागाने अतिवृष्टीच्या कालावधीतील भरती – ओहोटीच्या तारखा जिल्हा व तालुका प्रशासनास उपलब्ध करून द्याव्यात.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर या कालावधीत सीसीसी, डीसीएचसी व डीसीएचच्या ठिकाणी पावसाचे पाणी जावून रुग्णांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच या ठिकाणी अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहील यासाठी नियोजन करावे. तसेच कोविड केंद्रांसाठी जनरेटर उपलब्ध करून ठावेवेत.

महसूल व पोलीस विभाग यांनी आपल्या ताब्यातील बोटी सुस्थितीत असल्याची खात्री करावी. अतिवृष्टीच्या अनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती त्वरित जिल्हा नियंत्रण कक्षाला – 02362-228847 या संपर्क क्रमांकावर उपलब्ध करून द्यावी असेही सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here