देशभरात कोरोनाची संख्या वेगाने वाढत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. या अनुषंगाने ऑक्सिजनची कमी सगळीकडेच जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी मृत्यूंची संख्याही देशभरात वाढत आहे.म्हणूनच देवगड आणि वैभववाडीत ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे.अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली आहे