सिंधुदुर्ग– सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 31.7 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2788.48 मि.मी. पाऊस झाला आहे.
आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.300 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.400 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 51 मि.मी. पाऊस
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 51(2747), सावंतवाडी – 29(2997.1), वेंगुर्ला – 15.6(2282.8), कुडाळ – 34(2656), मालवण – 06(2980), कणकवली – 50(3073), देवगड – 28(2438), वैभववाडी – 40(3134), असा पाऊस झाला आहे
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 51(2747), सावंतवाडी – 29(2997.1), वेंगुर्ला – 15.6(2282.8), कुडाळ – 34(2656), मालवण – 06(2980), कणकवली – 50(3073), देवगड – 28(2438), वैभववाडी – 40(3134), असा पाऊस झाला आहे.