सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र मंगळवार दिनांक १३/७/२०२१ रोजी सोबत जोडलेल्या प्रपत्राप्रमाणे आयोजित करण्यात येत आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये ४५ वर्षांखालील लोकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. यावेळी ४५ वर्षांवरील नागरिकांना ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसऱ्या डोससाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.या नागरिकांच्या नावांची यादी सदर संस्थांना देण्यात आलेली आहे त्यामुळे या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपले लसीकरण करून घ्यावे.