सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ व्हेंटिलेटर्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

0
100

सिंधुदुर्ग– सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.नागरिकांनी जास्तीत जास्त नाक आणि तोंड झाकलेला मास्क वापरणे हे महत्वाचे आहे. त्याशिवाय बाहेरून आल्यानंतर आंघोळ यासारख्या गोष्टींचे पालन तर करावेच त्याशिवाय गर्दीची ठिकाणे टाळावे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांच्या उपचारासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 10 व्हेंटिलेटर्स जिल्ह्यासाठी पाठविले आहेत. तसेच जिल्हा नियोजनमधील 9 व्हेंटिलेटर्स अशा 19 व्हेंटिलेटर्सचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज केले. हे व्हेंटिलेटर्स गरजेनुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालयात बसविण्यात येणार असून यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर वाढवण्यास निश्चितपणे मदत होणार आहे.

या प्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here