सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 लाख 80 हजार 499 जणांनी घेतला पहिला डोस

0
90

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 80 हजार 499 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 816 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 369 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 903 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 6 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 92 हजार 230 व्यक्तींनी पहिला डोस तर 37 हजार 370 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

45 वर्षावरील 93 हजार 596 नागरिकांनी पहिला डोस तर 25 हजार 991 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 74 हजार 954 जणांनी पहिला डोस तर 10 हजार 100 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 3 लाख 67 हजार 335 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 3 लाख 44 हजार 700 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 51 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 93 हजार 220 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 2 लाख 72 हजार 618 कोविशिल्ड आणि 94 हजार 717 कोवॅक्सिन असे मिळून 3 लाख 67 हजार 335 डोस देण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 100 लसी उपलब्ध असून त्यापैकी 0 कोविशिल्डच्या आणि 100 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या 730 लसी शिल्लक असून त्यापैकी 260 कोविशिल्ड आणि 470 हजार कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here