सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 लाख 90 हजार 446 जणांनी घेतला पहिला डोस

0
128

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 90 हजार 446 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 820 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 405 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 905 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 116 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

तसेच 60 वर्षावरील 93 हजार 512 व्यक्तींनी पहिला डोस तर 40 हजार 605 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 95 हजार 950 नागरिकांनी पहिला डोस तर 31 हजार 120 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 81 हजार 259 जणांनी पहिला डोस तर 11 हजार 143 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 3 लाख 86 हजार 835 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 3 लाख 64 हजार 700 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 54 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 10 हजार 220 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 2 लाख 76 हजार 479 कोविशिल्ड आणि 1 लाख 10 हजार 356 कोवॅक्सिन असे मिळून 3 लाख 86 हजार 835 डोस देण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 340 लसी उपलब्ध असून त्यापैकी 0 कोविशिल्डच्या आणि 340 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 1 हजार 450 लसी शिल्लक असून त्यापैकी 300 कोविशिल्ड आणि 1150 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here