सिंधुदुर्ग जिल्ह्यात MHT-CET परीक्षा एस.ए.पी.एम.कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली या उपकेंद्रावर घेण्यात येणार

0
124

सिंधुदुर्ग: अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी MHT-CET ही सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे.

MHT-CET ही सामाईक प्रवेश परीक्षा सोमवार दि. 20 ते 24 सप्टेंबर सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.45 या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही परीक्षा एस.एस.पी.एम.कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली या उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे, या परीक्षेला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 138 इतकी आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here