सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीकरण

0
70

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र आजपासून दि. 3 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या लसीकरण सत्रासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रावर एकूण 7 हजार 560 लसी उपलब्ध असल्याची माहिती मुख्या कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यावेळी दुसऱ्या डोससाठी पात्र लाभार्थ्यांचे (ज्यांना पहिला डोस घेतलल्यावर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत.) प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन देखील नोंदणीची सोय उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील 18 ते 44 वर्षे वयोगातील नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन ही श्री नायर यांनी केले आहे. सदर लसीकरण सत्रादरम्यान उपलब्ध लसींची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

कोविशिल्ड लसी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय निहाय पुढीलप्रमाणे उपलब्ध आहेत. वैभववाडी – 80, उंब्रड – 80, खारेपाटण – 80, फोंडा – 80, कणकवली उपजिल्हा रुग्णालय 160, देवगड ग्रामीण रुग्णालय 160, पेंडूर – कट्टा – 100, मालवण – 160, पणदूर – 80, हिर्लोक – 80, कुडाळ – 160, जिल्हा सामान्य रुग्णालय – 160, वेंगुर्ला – 160, शिरोडा – 100, सावंतवाडी – 160, मोरगाव – 80, दोडामार्ग – 160 अशा एकूण 2 हजार 40 कोविशिल्ड लसी उपलब्ध असणार आहेत.

कोवॅक्सिन लसी पुढीलप्रमाणे उपल्बध आहेत. वैभववाडी तालुक्यातील सांळूवाडी- 80, भुईबावडा – 80, कणकवली तालुक्यातील शेर्पे – 80, तळेरे- 80, तोंडवळी – 80, नाटळ – 80, दारिस्ते – 80, करंजे – 80, शिवडाव – 80, बोर्डवे -80, कलमठ- 80, आशिये-80, भरणी – 80, करुळ – 80, देवगड तालुक्यात विजयदूर्ग – 80, वाडा – 80, मोंडपार – 80, वानिवडे – 80, गोवळे – 80, कोर्ले – 80, कुणकेश्वर – 80, नारिंग्रे – 80, जामसंडे – 80, वरेरी – 80, चौकेवाडी – 80, तोरसोले – 80, मालवण तालुक्यात वयंगणी – 80, आडेली – 80, मार्डे – 80, मिऱ्याबांद – 80, आनंदव्हळ – 80, वायरी – भूतनाथ – 80, वऱ्हाड – 80, कट्टा – 80, रामगड – 80, पोईप – 80, कुडाळ तालुक्यात जांबवडे – 80, पांग्रड – 80, गावराई – 80, अणाव – 80, पिंगुळी – 80, पावशी – 80, सालगाव – 80, माणगाव – 80, चेंदवण – 80, हुमरमळा – 80, वेंगुर्ला तालुक्यात भोगवे – 80, कुशेवाडा -80, वजराट – 80, वायंगणी – 80, पाल – 80, होडावडा – 80, अनसूर – 80, आरवली – 80, सावंतवाडी तालुक्यात आजगाव – 80, तळवणे – 80, आंबेगाव – 80, सांगेली – 80, माजगाव – 80, वेत्ये – 80, देवसू – 80, चौकुळ – 80, नेतर्डे – 80, कास – 80, दोडामार्ग तालुक्यात उसप -80, मोर्ले – 80, आयी – 80, वानोशी – 80, असनिये – 80 अशा एकूण 5 हजार 520 लसी उपलब्ध असणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here