सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील ITI प्रवेशासाठी नव्‍याने ऑनलाईन अर्ज करण्‍याची संधी

0
87

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थांमधील प्रवेश हुकलेले आहे, अशा इच्‍छुक उमेदवारांना रिक्‍त जागेवर प्रवेशासाठी नव्‍याने ऑनलाईन अर्ज करण्‍याची संधी प्रशिक्षण महासंचालनालयांनी उपलब्‍ध करुन दिलेली आहे. उमेदवारांनी २६ ऑक्‍टोंबर २०२१ पर्यंत itiadmissions@dvet.gv.in किंवा www.dvet.gov.in या अधिकृत संकेस्‍थळावर जाऊन अर्ज करावित. असे आवाहन व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (म.रा) संचालक दि.अ. दळवी यांनी केलेली आहे.

अर्ज केलेल्‍या इच्‍छूक उमेदवारांची गुणवत्‍ता यादी २७ ऑक्टोंबर २०२१ रोजी संबंधित संस्‍थेत स्‍थळावर लावण्‍यात येईल. दि२८ ऑक्‍टोंबर पासून रिक्‍त राहिलेल्‍या जागेसाठी समुपदेशन प्रवेश फेरी सुरु होईल. संकेतस्‍थळावर सूचित केलेल्‍या नोटीफिकेशन प्रमाणे पुढील कार्यवाही करण्‍यात यंणार आहे. शिल्‍प कारागीर योजना, आदिवासी उपाययोजना , अल्‍पसंख्‍याक योजना, सार्वत्रिक योजना, अनुसूचित जाती संबंधित आदी योजनांच्या अंतर्गत ज्या जागा रिक्त आहे त्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी ही शेवटची संधी संचालनालयाने उपलब्ध करुन दिलेली आहे. अलिकडे मोठमोठ्या औद्योगिक आस्थापनात आय.टी.आय. व्यवसाय प्रमाणपत्र धारकांना मोठी मागणी वाढलेली आहे.

समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नोंदणी करुन या प्रवेश फेरीचा इच्छुक उमेदवारांनी आवश्यक लाभ घ्यावा, औ.प्र.संस्थेच्या प्रवेशसाठीची ही संस्थास्तरावरची शेवटची संधी असल्याने प्रवेशासाठी इच्छुक अमेदवारांनी या संधीचा लाभ आवश्यक लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जवळच्या औ.प्र.संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (म.रा) संचालयक दि.अ.दळवी यांनी केलेले आहे. ००००० आय.टी.आय. प्रवेशसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. २५ (जि.मा.का.) जिल्‍ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थांमधील प्रवेश हुकलेले आहे, अशा इच्‍छुक उमेदवारांना रिक्‍त जागेवर प्रवेशासाठी नव्‍याने ऑनलाईन अर्ज करण्‍याची संधी प्रशिक्षण महासंचालनालयांनी उपलब्‍ध करुन दिलेली आहे.

उमेदवारांनी २६ ऑक्‍टोंबर २०२१ पर्यंत itiadmissions@dvet.gv.in किंवा www.dvet.gov.in या अधिकृत संकेस्‍थळावर जाऊन अर्ज करावित. असे आवाहन प्राचार्य र.फ.पाटील, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी यांनी केले आहे. अर्ज कलेल्या इच्छुक उमेदवारांची गुणवत्ता यादी २७ ऑक्टोंबर २०२१ रोजी संबंधित संस्थेत लावण्यात येईल. २८ ऑक्टोंबर २०२१ पासून रिक्त राहीलेल्या समुपदेशन प्रवेश फेरी सुरु होईल. समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नोंदणी करुन या प्रवेश फेरीचा इच्छुक उमेदवारांनी आवश्यक लाभ घ्यावा. औदयोगिक प्रशिक्षण संस्थेचा आवश्यक लाभ घ्यावा. अधिकच्या माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी, मु. सावंतवाडी (बाहेरचावाडा) ता. सावंतवाडी, दूरध्वनी क्र. ०२३६३ २७२१३६ अथवा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३३०४७३५,९४२०९१०९१२ वर संपर्क साधावा असे प्राचार्य श्री. पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांवतवाडी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here