सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृतीदिन साजरा

0
84

सिंधुदुर्ग- देशातील शहीद जवानांचा सर्वोत्तम त्याग व कर्तव्य बजावत असताना प्राप्त झालेल्या विरगतीस मानवंदना देण्यासाठी 21 ऑक्टोंबर 2021 राजी सिंधुदुर्गनगरी येथे पोलीस कवायत मैदानावर सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृतीदिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या उपस्थित पार पडला. 1 सप्टेंबर 2020 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत भारताचे विविध राज्यामधील पोलीस ठाणे तसेच विशेष पथकामध्ये कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या 377 वंदनीय वीर श्रेष्ठांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन राखीव पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांनी व त्यांचे पथकानं शस्त्र सलामीसह मानवंदना दिली.

21 ऑक्टोंबर 1959 रोजी लडाख मधील भारतीय सिमेवरील बर्फाच्छादीत व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी भारताचे 10 पोलीस जवान गस्त घालत असताना अचानक दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांचेवर हल्ला केला. त्या हल्याला शेवटपर्यंत चोख प्रत्युत्तर देत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. या विर जवानांनी आपल्या देशाच्या सीमेची रक्षण करताना दाखविलेल्या या उच्च कोटीच्या शौर्यांची गाथा इतरांना कळावी.तसेच राष्ट्र्र निष्टेची व कर्तव्य निष्टेची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत रहावी, म्हणून शहीद जवानांच्य स्मृतिप्रित्यर्थ दिनांक 21 ऑक्टोंबर हा दिवस संपुर्ण भारतभर पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. यावेळी कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांचेसह जिल्हयातील 25 पोलीस अधिकारी व 132 पोलीस अंमलदार उपस्थित होते. अशी माहिती पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एस.के. धनावडे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here