सिबीआय प्रमाणे ईडीच्या सुध्दा चौकशीला सहकार्य करणार -अनिल देशमुख

0
86
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून गुन्हा दाखल
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून गुन्हा दाखल

अनिल देशमुख यांनी आज ‘मी गृहमंत्री असतानाच्या काळात काही महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार बहुतेक नाराज असावे आणि त्यामुळे माझी चौकशी सिबीआय व ईडीच्या माध्यमातुन होत आहे’ असे सांगितले

दादरा नगर हवेलीचे सात वेळा खासदार असलेले मोहन डेलकर यांनी मुंबई येथे येवून केलेली आत्महत्या,तसेच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करुन योग्य तपास सुरु केला या गोष्टीमुळे केंद्र सरकार माझ्यावर नाराज होऊ शकते असे म्हणत त्यांनी “सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही”असेही सांगितले. मी सिबीआयला चौकशीसाठी सहकार्य केले त्याच पध्दतीने ईडीला सुध्दा सहकार्य करणार असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here