सीबीएसईच्या दहावी व बारावीची पहिल्या सत्राची बोर्ड परीक्षा होणार ऑफलाइन मोडने

0
119

कोरोनाच्या महमरीच्या टाळेबंदीनंतर सर्व नियम ,निर्बंध पळत आता सर्व शाळा,महाविद्यालये उघडत आहेत. यावेळी सीबीएसईच्या दहावी व बारावीची २०२१-२२ शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या बोर्ड परीक्षा प्रत्यक्ष घेण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल. ९० मिनिटांच्या पेपरमध्ये सर्वच प्रश्न ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे असतील. परीक्षार्थीला उत्तर लिहिण्यापूर्वी १५ मिनिटांऐवजी २० मिनिटे पेपर वाचण्यासाठी मिळतील.

विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल द्वितीय सत्राच्या परीक्षेनंतर जाहीर केला जाईल. दोन्ही सत्रांतील परीक्षेचे मूल्यमापन ५०-५० टक्के असेल. बोर्डाने सर्वच शाळांना निर्देश देऊन प्रॅक्टिकल, इंटर्नल अॅसेसमेंट आणि प्रोजेक्ट आदीचे काम पहिल्या सत्राची परीक्षा संपण्यापूर्वीच पूर्ण करण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here