सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार

0
55

सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान दिला जात आहे. ही माहिती सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी एप्रिलमध्ये दिली होती.

डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल इंडियाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. चाहत्यांमध्ये थलायवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार 25 ऑक्टोबर रोजी देण्यात येत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. सुपरस्टार रजनीकांतला दादासाहेब फाळके अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या दरम्यान रजनीकांत यांनी आपले मित्र आणि बस ड्रायव्हर राजबहादूर यांना धन्यवाद म्हटले. त्यांच्यामुळेच आपण चित्रपट क्षेत्रात आलो. रजनीकांत चित्रपट स्वीकारण्यासाठी स्टेजवर गेले तेव्हा त्यांची मुलगी ऐश्वर्या आणि जावई धनुष जल्लोषात टाळ्या वाजताना दिसून आले. यासोबतच त्यांनी रजनीकांत यांना स्टँडिंग अवेशन देखील दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here