सुलोचना महानोर यांचे वृद्धापकाळाने निधन

0
57

सुप्रसिद्ध कवी पद्मश्री कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पत्नी सुलोचना महानोर (वय ७९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.पळसखेडा येथील शेतातील राहत्या घरी पाच महिन्यांपासून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पती ना.धों.महानोर, मुले डॉ.बाळासाहेब महानोर, गोपाळ महानोर व तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

ना.धों.महानोर सारखा पती लाभूनही त्यांनी त्याचा कधीही गर्व केला नाही की शेती आणि घर सांभाळलं,वैभव आणल याचा बडेजाव मारला नाही. सहज, सोपं जगणं, वागणं, बोलणं यामुळेच त्या पटकन सगळ्यांना आपलंसं करून घ्यायच्या.सुलोचना महानोर यांच निर्मळ हसणे आपल्यातली नकारात्मकता नाहीशी करत असे. ज्यांच्यासाठी सगळं केलं ती अनेक माणसं उलटली, कृतघ्न झाली; पण तरी कधी बोलण्यात कटुता आली नाही अशा या सुलोचना महानोर काल पंचतत्वात विलीन झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here