सुशील चंद्रा यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती

0
110

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज(सोमवार) सुशील चंद्रा यांची देशाचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवण्याच्या परंपरेनुसार सुशील चंद्रा याचे नाव या पदासाठी अगोदरपासूनच निश्चित मानले जात होते.सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पर्यंत असणार आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुशील चंद्रा यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here