‘सॅनोटाईज’ चा एक नोझल स्प्रे जगभरात चर्चेत

0
82

कॅनेडियन कंपनी ‘सॅनोटाईज’ चा एक नोझल स्प्रे कोरोनाच्या संसर्गाशी लढताना लसीकरणाचे महत्व आज आपण जाणतोच आहे. सध्या भारतात अपुरे लसीकरण हा कळीचा मुद्दा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर कॅनेडियन कंपनी ‘सॅनोटाईज’ चा एक नोझल स्प्रे जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सेनोटाइजचा स्प्रेच्या कंपनीने ब्रिटन आणि न्यूझीलंडमधील क्लिनिकल ट्रायलमधून हा स्प्रे 99 टक्के प्रभावी ठरला असल्याचे सांगितले आहे .
सेनोटाइज नोझल स्प्रेची टेस्टिंग त्याचा मॅन्युफेक्चरिंग फॉर्मुला यूएसच्या यूटा स्टेट युनिव्हर्सिटीला (Utah State University) येथे पाठवला गेला. त्यानंतर तेथे विद्यापीठाच्या अँटी व्हायरल इंस्टीट्यूटने लॅब टेस्ट केल्यानंतर हा स्प्रे 99.9% प्रभावी असल्याचे सांगितले.
या कंपनीने केलेल्या दाव्यात संक्रमित व्यक्तीने 24 तासांच्या आत सॅनोटाईज नोझल स्प्रेचा वापरकेला तर त्याचा व्हायरल लोड 95% पर्यंत कमी होतो असे सांगितले आहे. तसेच 3 दिवसाच्या आत जर हा स्प्रे वापरला तर अशा व्यक्तीमध्ये व्हायरल लोड 99 %टक्के कमी होतो असे सांगून याबाद्दलची सर्व माहिती जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ‘जर्नल ऑफ इन्फेक्शनमध्ये यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे असे सांगितले.
हा नोझल स्प्रे या नायट्रिक ऑक्साईडपासून बनलेला आहे. नायट्रिक ऑक्साईड हे अँटी इफेक्टिव्ह मायक्रोबियल म्हणजेच बॅक्टेरिया आणि व्हायरसची वाढ रोखणारे केमिकल आहे. आपण स्प्रे घेतल्याबरोबर यामुळे नाकात एक अडथळा निर्माण करतो आणि हाच अडथळा नॉन स्पेसिफिक व्हायरसला लगेच नष्ट करतो. एकीकडे व्हायरस नष्ट होतो आणि दुसरीकडे नायट्रिक ऑक्साईड नाकातील उपस्थित रिसेप्टर्सच्या पेशींमध्ये विषाणूच्या प्रवेशास ब्लॉक करते. सर्वात महत्वाचे म्हणजे नायट्रिक ऑक्साईड हे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात आधीच उपस्थित आहे. त्यामुळे मानवी शरीरात या औषधाला सामावून घेण्यास कोणतीही अडचण येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here