सेंद्रीय भाजीपाल्यासाठी 30 दिवसात तयार झाल्या तब्बल 15 हजार परसबागा

0
93

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत 15 जून ते 15जुलै या कालावधीत ‘माझी पोषण परसबाग मोहीम’ अभियान राज्यभर राबविण्यात आली होती. हे अभियान “चळवळ पोषणाची-सर्वाच्या सहभागाची” या उक्तीप्रमाणे तीस दिवसाचे होते. या कालावधीत 12 हजार वैयक्तिक, सामुहिक परसबागा विकसीत करण्याचे उदिष्ट देण्यात आले होते. जैविक पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, फळे गरोदर माता, स्तनदा माता सहा ते 24 महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुलींच्या आहारामध्ये आणण्यासाठी ही मोहीम आहे.

16 तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांनी योजनेत सक्रीय सहभाग घेत तब्बल 15 हजार 131 परसबागेची निर्मिती केली. दिलेल्या उदिष्टांच्या 126 टक्के काम जिल्ह्याने या मोहीमेत केले. परसबागेच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला आणि त्याचे महत्व सर्वांना पटवून देण्यात आले. नागरिकांचे आरोग्य सुधारावे हा या मागचा उद्देश आहे. जिल्ह्यात मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून राज्यात जिल्ह्याची कामगिरी पहिल्या क्रमांकावर आहे.वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येक कुटुंबाने परसबागेची निर्मिती करावी. यातून सूक्ष्म अन्यद्रव्य घटक मिळाल्याने शारीरिक व मानसिक वाढ होण्यास मदत होईल. पर्यायाने सर्वांगीण विकास साधता येईल.

महिला उमेद अभियानाच्या माध्यमातून परसबागा बळकट होतील असे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here