सैफी-करीनाच्या लग्नाला 9 वर्षे पूर्ण

0
52

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला आज 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केले होते.  करीना सैफपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. आज लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करीनाने पती सैफला एक खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

करीनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ग्रीसचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसह करीनाने लिहिले, ‘एकेकाळी ग्रीसमध्ये. तिथे सूपची एक वाटी होती आणि आपण होतो आणि येथून माझे आयुष्य बदलले. जगातील सर्वात देखण्या माणसाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.’

चित्रपट ‘टशन’च्या चित्रिकरणादरम्यान दिसली. शूटिंगमधून वेळ काढून दोघेही लाँग वॉकवर जायचे. या दोघांच्या अफेअर्सचे गॉसिप सुरू झाले होते. लॅक्मे फॅशन वीकमध्ये सैफ-करीना पहिल्यांदा एकाच गाडीतून एकत्र आले होते. येथे पहिल्यांदाच आपण करीनाला डेट करत असल्याचे सैफने मान्य केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here