सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

0
123

आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आयबीजीएच्या संकेतस्थळानुसार, शुक्रवारी चांदी 66 हजार 727 रुपये प्रति किलोग्राम वर होती. जी आज 64 हजार 25 रुपये वर आली असून यामध्ये 2,702 रुपयांनी घट झाली आहे. तर सोने आज सकाळी 11 वाजता 1,206 रुपयांनी घसरण होत प्रति 10 ग्राम वर आले आहे. चांदी 63 हजार 694 रुपये प्रति किलो ग्रामवर ट्रेंड करत होती.

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठी खीळ बसली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था प्रगतीपथावर येण्यासाठी वेळ लागेल. या कारणास्तव सोने आपल्यासाठी फायदेशीर ठरत असून त्याचे भाव एका वर्षात 60 हजारांवर जाईल असा अंदाज वर्तवला आहे.

भारत देशात सोन्याचे भाव दिवसेदिवस वाढतच आहे. 1970 च्या तुलनेत सध्याचे भाव 261 पटीने वाढले आहे. विशेष म्हणजे 1970 मध्ये सोन्याचे भाव 184 रुपये प्रति 10 ग्राम होते. परंतु, आता 10 ग्रामसाठी 48 हजार रुपये मोजावे लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here