सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले; तब्बल 8800 रुपयांची घसरण

0
112
३ महिन्यांत सोने ६ हजारांनी महागले

सोने-चांदीत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली आहे. शनिवारी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,240 रुपये झाला आहे. मागच्या ट्रेडमध्ये सोन्याची किंमत 45,300 रुपये प्रती 10 ग्रॅमवर बंद झाली होती. तर चांदीचा दर हा 60,600 रुपये प्रति किलो झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.


मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 45,240 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 46,240 रुपये झाला आहे. पुण्यामध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 44,440 रुपये झाला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 47,580 रुपये झाला आहे. नागपूरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 45,240 रुपये झाला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 46,240 रुपये झाला आहे. तर चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर 60006 रुपये आहे. चांदीच्या (Sliver Rate) कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here