सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचे नियम १५ जूनपासून लागू

0
77

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचे नियम १५ जूनपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रमाणे देशात १५ जूनपासून हॉलमार्किंगचे नियम लागू केले जाणार आहेत. म्हणजेच देशात १५ जूनपासून केवळ हॉलमार्कच्या दागिन्यांची विक्री करण्यास परवानगी असणार आहे.

हॉलमार्किंग म्हणजे आता कोणत्याही दागिन्यांवर भारतीय मानक ब्युरोचे चिन्ह असणार आहे. कोणत्याही सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे हे एक खात्रीचे साधन असणार आहे. हॉलमार्किंग मध्ये एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. यावर भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)द्वारे निरीक्षण केले जाते. दागिन्यांवर हॉलमार्कचे चिन्ह असेल तरच ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते.त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी दागिन्यांवर बीआयएस चा हॉलमार्क आहे की नाही याची तपासणी करणे आता आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here