स्पर्धा परीक्षांच्या ‘प्रेरणा उपक्रमाचे’ तिसरे सत्र आयोजित

0
97

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा उपक्रम सुरु केला आहे.या आधी दोन मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत उद्या गुरुवार दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी सायं. 5 ते 6 या वेळेत मार्गदर्शनाचे तिसरे सत्र आयोजित करण्यात आले आहे.

या आयोजित सत्रात स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, या बरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले जाणार आहे.

श्री.वैभव साबळे जिल्हा प्रशासकीय अधिकारी नगर विकास शाखा सिंधुदुर्ग आणि श्री.नितीन गाढवे ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,न.प.कुडाळ हे मग्देर्शन करणार आहेत.सिधुदुर्ग जिल्ह्यातील स्पेर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here