भारतात स्पुटनिक लाईट लसीच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. वेगाने लसीकरण करण्यासाठी स्पुटनिक लाईट ही भारतासाठी संजीवनी ठरणार आहे. आता केंद्र सरकारनं या लसीला वापरासाठी मान्यता दिली आहे.रशियन कंपनीची स्पुटनिक व्ही (Sputnik V) बाजारात उपलब्ध आहे. रशियाची पहिला लस स्पुटनिक व्ही कोविड19 संसर्गाविरोधात 97.6 टक्के प्रभावी आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले होते.
3.8 दशलक्ष लोकांच्या आकडेवारीवर ही माहिती आधारित आहे. भारताला स्पुटनिक व्ही लसीचे 1.5 लाख डोस प्राप्त झाले आहेत. पुढील दोन दिवसांत आणखी 1.5 लाख डोस पोहोचण्याचा अंदाज आहे.“स्पुटनिक लाइट लस दिल्यानंतर 28 दिवसानंतर घेण्यात आलेल्या विश्लेषणात्मक आकडेवारीनुसार 79.4 टक्के या लसीची कार्यक्षमता दिसून आली. रशियाच्या लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 5 डिसेंबर 2020 ते 1 एप्रिल 2021 या कालावधीत हे लसीकरण करण्यात आले होते.