स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून अंतराळ सफरीला गेलेले चार सामान्य लोक परत

0
88

अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी अंतराळ संशोधनाचा एक भाग म्हणून स्पेसएक्स कंपनीच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून अंतराळ सफरीला चार सामान्य नागरिकांना पाठविले होते. हे लोक काल रात्री आपल्या अंतराळ सफरीहून परत आले आहेत.आज सकाळी विमानाने फ्लोरिडा किनाऱ्यापासून अटलांटिक महासागरात लँडिंग केले. अंतराळ सफरीचे नाव इंस्पिरेशन -४ असे ठेवण्यात आले होते. या सफरीला तीन दिवसांपूर्वी एकूण चार लोक गेले होते.

अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी अमेरिकेच्या टेनिस भागात आहे.या कंपनीचे नासा या खगोलशास्त्रीय कंपनीबरोबर भागीदारीत अंतराळ संशोधन केले जाते.  या मिशनने जगाला स्पेस सामान्य नागरिकांसाठी म्हणजेच आपल्या सर्वांसाठी आहे दाखवून दिले आहे असे उद्योजक एलन मस्क म्हणाले आहेत.या स्पेस सफारीसाठी निवडण्यात येणाऱ्या स्पर्धकांसाठी एका निबंध स्पेर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यातून या चार स्पेर्धकांची निवड करण्यात आली आहे .

इसाकमन शिफ्ट वय ३८ वर्ष, हे एक प्रोफेशनल पायलट आहेत आणि अमेरिकन हवाई दलाच्या वैमानिकांना त्याच्या पायलट प्रशिक्षण कंपनीद्वारे प्रशिक्षण देतात.ते एका पेमेंट कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.तर शॉन प्रोक्टरया 51 वर्षीय असून एरिझोना येथील महाविद्यालयात जियोलॉजीच्या प्राध्यापक आहेत. प्रोक्टर यांच्या वडिलांनी अपोलो मोहिमेदरम्यान नासासोबत काम केले आहे. त्यांनी स्वतः नासाच्या अंतराळ कार्यक्रमात अनेक वेळा भाग घेतला आहे.क्रिस सेम्ब्रोस्की हे 42 वर्षीय असून त्यांनी क्रिस अमेरिकन हवाई दलात वैमानिक म्हणून काम केले होते आणि इराक युद्धातही सहभागी होते. क्रिस सध्या एयरोस्पेस आणि डिफेंस निर्माता कंपनी लॉकहीड मार्टिनसोबत काम करत आहेत.29 वर्षीय हेयली अंतराळात जाणारी सर्वात तरुण अमेरिकन नागरिक आहे तिला हाडांचा कर्करोग झाला होता आणि तिच्यावर टेनेसीच्या सेंट जूड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यातून हेयली आता पूर्ण बरी झाली आहे.मिशनमध्ये, या हेयली यांना वैद्यकीय अधिकाऱ्याची जबाबदारी मिळाली होती.

अमेरिकेत संध्याकाळी ७.३० वाजता स्पेसएक्स कॅप्सूल पॅराशूटसह समुद्रात उतरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here