स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन

1
175
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून मंगळवार दि. 27 डिसेंबर रोजी जिल्ह्यात समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-बिलिंगच्या-बाबतीत-चांग/

या सर्व समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांत जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटकांची मोठ्याप्रमाणात रेलचेल जिल्ह्यात असते. जिल्ह्यात येणारा पर्यटक समुद्र किनारी भेटी देत असतो. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ सुंदर समुद्र किनारे पाहता यावेत या हेतूने दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते 11.30 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारी स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांचे आयोजन श्रमदानातून होणार आहे. तरी जिल्हावासियांनी आपल्या नजिकच्या समुद्र किनारी जाऊन श्रमदान करुन समुद्र किनारे स्वच्छ करावेत असे आवाहन ही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर यांनी केले आहे. मालवण ग्रामपंचात तोंडवली येथील समुद्र किनारा स्वच्छतेकरिता जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थित राहून श्रमदान करणार आहेत

1 COMMENT

  1. […] ओरोस: कोवीडबाबत पूर्वतयारी आणि सतर्कता म्हणून आज आढावा बैठक झाली. आपली आणि इतरांची सुरक्षितता म्हणून नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. http://sindhudurgsamachar.in/स्वच्छ-भारत-मिशन-ग्रा-अंत/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here