हायकोर्टाकडून खासदार नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द

0
91

उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. यासह खासदार राणा यांना कोर्टाने 2 लाख रुपयांचा दंड

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. या निवडणूक निकालानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने आज निकाल दिला. उच्च न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करून नवनीत राणा यांना दोन लाखाचा दंड ठोठावला आहे. तसेच सदरचे खोटे जात प्रमाणपत्र सहा आठवड्याच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रमाणप्रत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटे ठरले तर संबंधित सदस्याचे पद रद्द होऊ शकते. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्याबाबत काय होत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केले असले तरी, या निर्णयाविरोधात त्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here