हुमरस ग्रामविलगीकरण कक्षाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन ; नानेली ग्रामविलगीकरण कक्षाला दिली भेट

0
84

कुडाळ तालुक्यातील हुमरस येथील प्राथमिक शाळेत ग्राम विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला असून आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ग्राम विलगीकरण कक्षाचे उदघाटन करण्यात आले. त्याचबरोबर नानेली येथील ग्रामविलगीकरण कक्षाला आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. हुमरस व नानेली या दोन्ही ठिकाणच्या कोविड स्थितीचा त्यांनी आढावा घेत गावातील कोविड उपाययोजनांबाबत संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. नागरिकांच्या लसीकरणाबाबतही सूचना केल्या. ज्यांना लक्षणे आहेत त्या नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ कोविड टेस्ट करण्याचे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले.

यावेळी हुमरस येथे जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर,सरपंच अनुप नाईक, कृष्णा धुरी, उपसरपंच महादेव परब, ग्रामसेवक सौ. राऊळ, आरोग्य अधिकारी सोनिया कदम, आरोग्य सेविका वैदेही पडते,केंद्रप्रमुख श्री. चव्हाण, मुख्याध्यापिका दीप्ती तळवणेकर, शिक्षिका स्नेहा परब, तलाठी पीटर लोबो, झोनल ऑफिसर श्री. सावंत,यासंह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


नानेली येथे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, कृष्णा धुरी, योगेश धुरी, कौशल जोशी, सरपंच प्रज्ञेश धुरी, मुख्याध्यापक सरिता गोलतकर, ग्रामसेविका चेतना म्हाडगूत, परशुराम घाडी आदी उपस्थित होते.

      
     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here