‘हे आपलं काळीज हाय’ या टॅगलाईनने सोशल मीडियावर धुमाकूळ

0
111

 ‘हे आपलं काळीज हाय’ ही टॅगलाईन ‘143’ या मराठी चित्रपटाची असून चित्रपटात कोण कोणाचे काळीज आहे हे ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ तर्फे आणि विरकुमार शहा निर्मित ‘143’(हे आपलं काळीज हाय) या प्रेममय भावना व्यक्त करणाऱ्या चित्रपटातून लवकरच उलगडणार आहे. नुकतेच या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण दाक्षिणात्य पद्धतीने केले असून मराठी चित्रपटांमध्ये वेगळेपण दर्शविणारा हा सिनेमा असणार आहे.दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई केरला यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलली आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. 

कोरोनाच्या काळात चित्रपटगृहांनाही पूर्णविराम मिळाला असून रसिक प्रेक्षकांच्या नजरा मनोरंजनाकरिता चित्रपटगृहाकडे वळल्या आहेत यातच प्रेमाचे लव्हेबल फंडे घेऊन चित्रपटगृह सुरू होताच ‘143’(हे आपलं काळीज हाय) ​हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here