कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताला आपल्या घट विळख्यात आवळले आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाही आहेत,ऑक्सिजनचा तुटवडा झाला आहे, मृत्यू वाढत आहेत. औषधे मिळत नाही आहेत, रुग्णवाहिका मिळत नाहीत, देशातील जनता हवालदिल झालेली दिसत आहे. व्हेन्सी कृष्णा या यवतीच्या आईला कोरोना झाला आणि त्या अनुषंगाने तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांच्या आईला कोणत्याही रुग्णालयात बेड मिळाला नाही आणि शेवटी त्यांनी आपल्या आईला घरीच उपचार केले.सुदैवाने त्या कोरोनमुक्त झाल्या पण यातून इतरांनाही याच अडचणींना सामोरे जावे लागत असेल असे त्यांना वाटू लागले.
लोकांचा हा प्रॉब्लेम कसा सोडवावा यासाठी त्या विचार करू लागल्या. तेव्हा त्यांनी त्यांची मैत्रीण मेधा ज्या सामाजिक कार्यकर्ताही आहेत त्यांच्याही बोलल्या. महत्वाचे म्हणजे मेधा या हैदराबादमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवणा-यांची यादी तयार करत होत्या. दोघांनी या मुद्द्यावर एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. यानंतर डेटा तज्ज्ञ अभिषेकही त्यांच्या टीममध्ये सामील झाले.
हैदराबादच्या या तिघांनी मिळून Hydcovidresources.com नावाचे यूजर फ्रेंडली अॅप तयार केले. या अॅपमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर, रुग्णालय आणि डॉक्टरांपासून ते रुग्णवाहिकेपर्यंतची सर्व माहिती सहज मिळवता येते. हैदराबादमध्ये केव्हा आणि कुठे या गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्यापर्यंत कसे पोहचावे याची संपूर्ण माहिती या अॅपमध्ये आहे. हे अॅप अवघ्या २ तासात तयार करण्यात आले आहे आणि अवघ्या तीन ते चार तासात, संध्याकाळपर्यंत या अॅपला 10 हजारांहून अधिक यूजर्स मिळाले होते. दुसर्या दिवशी सोशल मीडियावर अॅप शेअर केल्यानंतर यूजर्सची संख्या वाढली आणि अवघ्या पाच दिवसांत 2 लाखांहून अधिक यूजर्स जोडले गेले.