१ जूनपर्यंत महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू

0
168

मुंबई – राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत ठाकरे सरकारने राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता १ जून २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील. राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या महिनाभरापासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत होती त्याला आळा घालण्यासाठी ठाकरे सरकारनं सुरुवातीला ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर हे निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले होते.

सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ स्थिरावली असली तरी कडक निर्बंध हटवून राज्य सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळात राज्यातील कडक निर्बंध पुढे वाढवण्यावर एकमत झाले. त्यानंतर आता ब्रेक द चेन अंतर्गत ठाकरे सरकारने राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता १ जून २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here