२०१९ मध्ये १.३६६ अब्ज लोकसंख्या असलेला भारत २०२७ पर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. चीनला पिछाडीवर टाकण्याचा अंदाज आहे. चीनची वृद्ध लोकसंख्या भारताच्या तरुण लोकसंख्येचा मुकाबला करण्यात अयशस्वी होईल, असे चीनच्या सेंट्रल बँकेने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या जून २०१९ मधील अहवालानुसार चीनमध्ये लोकसंख्येला आेहोटी लागेल. आता आगामी दहा वर्षांत भारतातील लोकसंख्या चीनला आव्हानात्मक ठरू शकते.