२४ तासांत मॉन्सून समुद्रात दाखल होणार शक्यता

0
99

आगामी २४ तासात मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्या लगतच्या दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे.पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात २२ मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. २४ मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तविला आहे.त्यानंतर ते २६ मे रोजी सकाळी ओडिशा व पश्चिम बंगाल दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

नैऋत्य उत्तर प्रदेश ते मध्य पूर्व अरबी समुद्रापर्यंत पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण मार्गे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधूदूर्ग या जिल्ह्यात शुक्रवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २१ मे तसेच २३ व २४ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात २३ व २४ मे रोजी मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here