अंधेरीतील ओशिवरा प्रसूतीगृहाचे लोकार्पण
महिलांना अत्याधुनिक मातृत्व आरोग्यसेवेची सुविधा
मुंबई, दि. ६ ऑगस्ट :
अंधेरी (पश्चिम) परिसरातील महिलांसाठी आणि कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ओशिवरा प्रसूतीगृहाच्या लोकार्पण सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. अत्याधुनिक सुविधा, सुरक्षित मातृत्व सेवा आणि दर्जेदार आरोग्यसेवा नागरिकांना त्यांच्या परिसरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे प्रसूतीगृह उभारण्यात आले आहे.



