अंबरनाथ निवडणूक तात्पुरती स्थगित

0
116
अंबरनाथ निवडणूक तात्पुरती स्थगित
अंबरनाथ निवडणूक तात्पुरती स्थगित

अंबरनाथ निवडणूक तात्पुरती स्थगित

अंबरनाथ : राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार अंबरनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अखेर स्थगित करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जांवरील अपिलांचे निकाल वेळेवर न लागल्याने सुधारित कार्यक्रम जाहीर होईपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

२९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या शासनादेशात नमूद करण्यात आले आहे की, ज्या प्रभागांसाठी दाखल केलेल्या अपिलांचा निकाल जिल्हा न्यायालयाकडून २२ नोव्हेंबरनंतर म्हणजे २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, त्या जागांची निवडणूक मूळ घोषित कार्यक्रमानुसार ४ डिसेंबरला घेता येणार नाही. एवढेच नव्हे, जर संबंधित प्रकरणात नगराध्यक्ष पदाचा समावेश असेल, तर संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्याचेही निर्देश आयोगाने दिले आहेत.

या सूचनांच्या अनुपालनात अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक अधिकृतपणे स्थगित करण्यात आली असून आता ती सुधारित वेळापत्रकानुसार होणार आहे. नवीन कार्यक्रमाची घोषणा ४ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळवले.

या घडामोडीमुळे राजकीय वातावरणात नवीन हालचाली सुरू होण्याची शक्यता असून उमेदवारांमध्येही संभ्रम कायम आहे. नगरपरिषद निवडणुकीची पुढील दिशा सुधारित कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here