अजित पवार यांचा अपघात नसून घातपात – रोहित पवार

0
33
दादांच्या विमानात ब्लॅक बॉक्सचा फोटो AAIB च्या अहवालात का नाही? - रोहित पवार
दादांच्या विमानात ब्लॅक बॉक्सचा फोटो AAIB च्या अहवालात का नाही? - रोहित पवार

अजित पवार यांचा अपघात नसून घातपात – रोहित पवार

बारामती l प्रतिनिधी

बारामती विमानतळ परिसरात विमान घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. ही घटना अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील काही मुद्दे मांडले.

रोहित पवार म्हणाले, “हा अपघात होता की घातपात, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आज मी जे सादरीकरण केलं, त्यातून प्रत्येक गोष्ट कशी घडली, कुणाचं विमान होतं, ते कशा पद्धतीने वापरात होतं, याची माहिती दिली आहे. मी कुणावर थेट आरोप करत नाही, मात्र वस्तुस्थिती समोर मांडतोय.”

या घटनेबाबत बोलताना रोहित पवार यांनी व्हीएसआर विमान कंपनी, अॅरो नावाची कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यांच्याबाबत शंका व्यक्त केली. अॅरो कंपनीने व्हीएसआर कंपनीचं विमान हायर केल्याची माहिती देत, हे सरकारी जीआरनुसार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘पवार’ आडनावाचा एक व्यक्ती अॅरो कंपनीचा हँडलर असून, त्याने विमान उड्डाणावेळी व्हिजिबिलिटी क्लिअर असल्याचे सांगितल्याचा दावाही त्यांनी केला. ही कंपनी अनेक राज्यांत काम करत असून, तिचे काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा संशयही रोहित पवार यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, “डीजीसीएवर आमचा विश्वास आहे. सरकारवर किंवा कोणावरही थेट आरोप नाहीत. मात्र काही गोष्टी संशयास्पद वाटतात. अशा प्रकरणात पोलिसांना विमानतळावर तपासाची परवानगी नसते, सीआयडीचीही ही एक्सपर्टीज नाही. त्यामुळे बाह्य तज्ज्ञ एजन्सीकडून चौकशी व्हावी.” तसेच, ब्लॅक बॉक्समधील संपूर्ण रेकॉर्डिंग तपासताना कुटुंबातील एका सदस्याला तज्ज्ञांसोबत उपस्थित राहण्याची संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली. “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here