अरुळे येथे नाचणी खरेदीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन सभा उत्साहात संपन्न!

0
6
अरुळे येथे नाचणी खरेदीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन सभा उत्साहात संपन्न!
अरुळे येथे नाचणी खरेदीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन सभा उत्साहात संपन्न!

अरुळे येथे नाचणी खरेदीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन सभा उत्साहात संपन्न!

कोकण विभागीय नाचणी खरेदी केंद्र वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाला मंजूर; शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी व खरेदी प्रक्रियेची माहिती

वैभववाडी (प्रतिनिधी)
वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने नाचणी खरेदीविषयक मार्गदर्शन सभा छत्रपती विकास सेवा सोसायटी, अरुळे तसेच ग्रामपंचायत कार्यालय, अरुळे येथे आयोजित करण्यात आली होती.
या सभेला वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे, छत्रपती विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. सूर्यकांत बोडके, अरुळे गावच्या सरपंच सौ. मानसी रावराणे, ग्रामपंचायत सदस्य, संघाचे सर्व संचालक मंडळ, संघाचे सचिव श्री. सिद्धेश रावराणे तसेच अरुळे गावातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना संघाचे चेअरमन प्रमोदजी रावराणे यांनी कोकण विभागीय नाचणी खरेदी केंद्र वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाला मिळाल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली. या केंद्रामुळे तालुक्यातील नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नाचणी खरेदीसंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया व शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
संघाचे सचिव श्री. सिद्धेश रावराणे यांनी खतांचे ऑनलाइन बुकिंग, धान-भात खरेदी तसेच नाचणी खरेदीसाठी आवश्यक ऑनलाइन रजिस्ट्रेशन याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन झाले.
शेतकऱ्यांना शासकीय खरेदी योजनांचा लाभ मिळावा आणि नाचणी उत्पादकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here