अलिबागमध्ये पीएनपी कला विकास मंडळातर्फे काव्य संमेलन उत्साहात संपन्न

0
37

पीएनपी कला विकास मंडळ अंतर्गत साहित्य प्रभागाच्या वतीने अलिबाग येथे काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १० मे २०२६ रोजी झालेल्या या साहित्यिक कार्यक्रमाला कवी आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अलिबाग येथील पीएनपी एज्युकेशनच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या काव्य संमेलनात ५० हून अधिक कवींनी सहभाग घेत आपल्या कविता सादर केल्या.

“माझ्या आठवणीतील शाळा”, “हरवलेले बालपण” आणि “माती” या भावस्पर्शी विषयांवर आधारित कवितांनी उपस्थितांना भावूक केले. विविध कवींनी आपल्या शैलीतून बालपणाच्या आठवणी, मातीतली ओढ आणि जीवनातील संवेदनशील पैलूंना शब्दबद्ध करत वातावरण साहित्यरसिकांनी भारावून टाकले.

या कार्यक्रमामुळे अलिबाग परिसरातील साहित्यिक आणि काव्य चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here