अलिबाग राजा गणेशोत्सव मंडळ, बिव्हळचाळ येथे ‘लोकसंवाद-२०२६’ उत्साहात संपन्न.

0
10
अलिबाग राजा गणेशोत्सव मंडळ, बिव्हळचाळ येथे ‘लोकसंवाद-२०२६’ उत्साहात संपन्न.
अलिबाग राजा गणेशोत्सव मंडळ, बिव्हळचाळ येथे ‘लोकसंवाद-२०२६’ उत्साहात संपन्न.
अलिबाग राजा गणेशोत्सव मंडळ, बिव्हळचाळ येथे ‘लोकसंवाद-२०२६’ उत्साहात संपन्न
युवकांना स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती
मुंबई :
अलिबाग राजा गणेशोत्सव मंडळ, बिव्हळचाळ येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी युवकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासह विविध स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक उद्योग अधिकारी सनी बनसोडे यांनी युवकांना स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती दिली. या योजनेंतर्गत उत्पादन उद्योगासाठी १ कोटी रुपयांपर्यंत, तर सेवा व कृषीपूरक व्यवसायांसाठी ५० लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना संधी असल्याचे त्यांनी सांगितले. पात्र लाभार्थ्यांना १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
उत्पादन, सेवा, खाद्य व्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, होमस्टे, जलक्रीडा, ई-वाहतूक आदी विविध व्यवसायांसाठी या योजनेचा लाभ घेता येतो. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून युवकांनी योजनेचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने पाऊल टाकावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष महेश कोटीयन, विद्यार्थीनी तसेच नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here