असा झाला अपघात……….

0
68
उपमुख्यमंत्र्यांच्या चार्टर्ड विमान अपघाताची चौकशी सुरू......
उपमुख्यमंत्र्यांच्या चार्टर्ड विमान अपघाताची चौकशी सुरू..........

असा झाला अपघात……….

अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे.

“पहिल्यांदा ते विमान वरुन गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमीनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला.” असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग

दरम्यान भीषण अपघात झाला. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेत विमानातील सर्व ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत दाखल होणार होते.

विमान धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. सुरुवातीला उपमुख्यमंत्री गंभीर जखमी असून त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातम्या येत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here