आंदुर्लेच्या सुपुत्राची धाडसी कामगिरी – परूळे दुतोंड रस्त्यावर सातफुटी अजगराला पकडले!

0
25
आंदुर्लेच्या सुपुत्राची धाडसी कामगिरी - परूळे दुतोंड रस्त्यावर सातफुटी अजगराला पकडले!
आंदुर्लेच्या सुपुत्राची धाडसी कामगिरी - परूळे दुतोंड रस्त्यावर सातफुटी अजगराला पकडले!

आंदुर्लेच्या सुपुत्राची धाडसी कामगिरी – परूळे दुतोंड रस्त्यावर सातफुटी अजगराला पकडले!

कुडाळ/आंदुर्ले:
आंदुर्ले गावचे सुपुत्र मनोहर वालावलकर यांनी आज एक थरारक आणि धाडसी कामगिरी करून दाखवली. परूळे-दुतोंड या वर्दळीच्या रस्त्यावर अचानक दिसलेल्या तब्बल सात फुटी अजगराला त्यांनी शिताफीने पकडून सुरक्षित स्थळी हलवले.
संध्याकाळ सुमारास परूळे-दुतोंड रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला एक अवाढव्य अजगर दिसला. सात फुटांपेक्षा लांब असलेला हा अजगर पाहून वाहनचालक आणि पादचारी घाबरून गेले. वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. घटनास्थळी उपस्थीतआंदुर्लेचे रहिवासी आणि सर्पमित्र मनोहर वालावलकर तातडीने कोणताही गोंधळ न करता, अत्यंत संयमाने आणि कौशल्याने त्या अजगराला पकडले. त्यांच्या या धाडसाचे उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. पकडल्यानंतर अजगराला सुरक्षितपणे त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलेआहे.
मनोहर वालावलकर हे यापूर्वीही अनेकवेळा विषारी आणि बिनविषारी सापांना जीवदान देऊन त्यांना निसर्गात सोडण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे रस्त्यावरील संभाव्य धोका टळला आणि एका मुक्या जीवाचेही प्राण वाचले. आंदुर्ले गावाच्या या सुपुत्राने आपल्या धाडसाने संपूर्ण परिसराची मान उंचावली आहे.
आवाहन: अजगर, साप किंवा इतर वन्यजीव दिसल्यास नागरिकांनी त्यांना मारू नये किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ वनविभागाशी किंवा स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here