आंबेगावच्या सुपुत्राची मोठी झेप; प्रशांत लोखंडे सीबीएसई अध्यक्षपदी नियुक्त

0
54

नवी दिल्ली / आंबेगाव, दि. — आंबेगाव तालुक्यातील वळती गावचे सुपुत्र आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी प्रशांत सिताराम लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे संपूर्ण आंबेगाव तालुका तसेच महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, दूरदृष्टी आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे प्रशांत लोखंडे यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विद्यार्थीकेंद्रित, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रशांत लोखंडे यांची सीबीएसई अध्यक्षपदी झालेली निवड ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here