आदर्श आचारसंहितेमुळे १ जूनचा रायगड जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

0
91
रत्नागिरी जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ ऑक्टोबरला
रत्नागिरी जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ ऑक्टोबरला

आदर्श आचारसंहितेमुळे १ जूनचा रायगड जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

रायगड जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी होणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २६ सप्टेंबर २०१२ च्या शासन परिपत्रकानुसार जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित मतदारसंघात दि. २५ मे २०२६ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
दि. २५ मे ते २५ जून २०२६ या निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहिता प्रभावी राहणार असून, शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार १ जूनचा लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here