आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे रामराज येथील सांबेश्वर मंदिरात भाविकांसाठी बेंचची सुविधा
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे रामराज येथील सांबेश्वर मंदिरात भाविकांसाठी बेंचची सुविधा
अलिबाग :
व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, अलिबाग यांच्या वतीने रामराज येथील श्री सांबेश्वर मंदिरात भाविकांना आणि नागरिकांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून देण्यात आले.
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच परिसरातील नागरिकांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पतसंस्थेने हा उपक्रम राबविला. संस्थेच्या या सामाजिक कार्यातून सेवा, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
आर्थिक क्षेत्रात कार्यरत असतानाच समाजाच्या गरजा ओळखून अशा प्रकारचे उपक्रम राबविणे ही संस्थेच्या सामाजिक जाणिवेची ओळख आहे. आदर्श पतसंस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल रामराज येथील ग्रामस्थांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.