आदर्श पतसंस्थेचा हरित संकल्प; यंदा ६,००० झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन
आदर्श पतसंस्थेचा हरित संकल्प; यंदा ६,००० झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन
अलिबाग : पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आदर्श पतसंस्था, अलिबाग यांनी यंदाच्या पावसाळ्यात ६,००० झाडे लावण्याचा आणि त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे.
आदर्श पतसंस्थेचे संस्थापक, मार्गदर्शक व प्रेरणास्थान श्री. सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून अलिबाग व परिसरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करून पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक प्रभावी करण्यावर संस्थेचा भर राहणार आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटणारे हरित क्षेत्र लक्षात घेता हा उपक्रम पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींनी या मोहिमेत सहभागी होऊन हरित अलिबाग घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.