आदर्श पतसंस्थेच्या हरित उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
10
आदर्श पतसंस्थेच्या हरित उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आदर्श पतसंस्थेच्या हरित उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आदर्श पतसंस्थेच्या हरित उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

५,०६७ वृक्षलागवडीसाठी नागरिकांचा सहभाग

अलिबाग, दि. २३ :
आदर्श पतसंस्था, अलिबाग यांच्या पर्यावरण संवर्धन उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ५,०६७ झाडे लावण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.
संस्थेच्या या उपक्रमातून केवळ वृक्षलागवडच नव्हे, तर पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी हिरवा वारसा निर्माण करण्याचा संदेश दिला जात आहे. समाजाच्या सक्रिय सहभागातून पर्यावरणपूरक भविष्य घडविण्याचा हा प्रयत्न अधिक व्यापक होत असल्याचे संस्थेने सांगितले.
हा प्रवास फक्त झाडांचा नाही, तर पर्यावरण जपण्याचा, पुढील पिढ्यांसाठी हिरवा वारसा निर्माण करण्याचा आणि समाजासाठी सकारात्मक बदल घडवण्याचा आहे. तुमच्या सहभागामुळे आपण एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. चला, मिळून हा हरित प्रवास आणखी पुढे घेऊन जाऊया,” असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
या अभियानात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आदर्श पतसंस्थेने मनःपूर्वक आभार मानले असून, अधिकाधिक नागरिकांनी या हरित चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here