आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन; पुण्यातील लोकेशनच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू

0
5

आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन; पुण्यातील लोकेशनच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई  l प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या बंगल्यावरील दोन निळ्या शर्ट घातलेल्या व्यक्तींना हटवण्याची धमकी फोनवरून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या फोनचे लोकेशन पुण्यात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आल्याची माहिती आहे. त्यातच आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी मिळाल्याचे प्रकरण समोर आल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
आमदार आव्हाड यांनी स्वतः सोशल मीडियावर ट्विट करून धमकी मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर रात्री त्यांना फोनवरून धमकी देण्यात आल्याचे वृत्त समोर आले. संबंधित फोनचे लोकेशन पुण्यात असल्याचे सांगितले जात असून, पुणे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास सुरू केला आहे.
यापूर्वीही जितेंद्र आव्हाड यांना धमक्या मिळाल्याची माहिती आहे. या प्रकरणावर ठाणे शहर पोलिसांनीही सोशल मीडियावर ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध आणि या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here