इतिहासात प्रथमच! भारतीय सैन्य अकादमीतून ९ महिला कॅडेट्स उत्तीर्ण
डेहराडून : भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून, इतिहासात प्रथमच भारतीय सैन्य अकादमी (IMA) मधून ९ महिला कॅडेट्स यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत डेहराडून येथील भारतीय सैन्य अकादमीमध्ये १५८ व्या नियमित अभ्यासक्रमाच्या आणि १४१ व्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाचा भव्य सोहळा पार पडला.



